Tue, Feb 7, 2023

गाडगे महाराज स्मृतीदिनानिमित्त स्वच्छ्ता अभियान
गाडगे महाराज स्मृतीदिनानिमित्त स्वच्छ्ता अभियान
Published on : 22 December 2022, 10:54 am
गोरेगाव, ता. २२ (बातमीदार) : राष्ट्रसंत संत गाडगे महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त रिपाइं आठवले गटाच्या गोरेगाव विधानसभेच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले. रिपब्लिकन पक्ष गोरेगाव तालुका कार्यकारिणी व समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या वतीने गोरेगाव पूर्व विभागातील निगोज रोड, महात्मा जोतीराव फुले विचार मंच, नालंदा बुद्ध विहार, सोमनाथ मंदिर, मदरसा नुरे इलाही तालीमूल इस्लाम (मस्जिद) व सम्राट अशोकनगर सहकारी गृहनिर्माण संस्था या परिसरात हे अभियान राबवण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष रेश्मा खान, सचिव रमेश पाळंदे, ॲड. प्रवीण टेकाळे, छाया राऊत तसेच अनेक विभागांतील नागरिकांनी सहभाग घेतला होता; तर या कार्यक्रमाचे आयोजन गोरेगाव तालुका अध्यक्ष रमेश पाईकराव यांनी केले होते.