तळोजाकरांची सुरक्षा भक्षकांच्या हाती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळोजाकरांची सुरक्षा भक्षकांच्या हाती
तळोजाकरांची सुरक्षा भक्षकांच्या हाती

तळोजाकरांची सुरक्षा भक्षकांच्या हाती

sakal_logo
By

खारघर, ता. २२ (बातमीदार) : तळोजा वसाहतीतील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये अवघ्या पाच वर्षांच्या मुलीवर बलात्काराची घटना नुकतीच घडली होती. या प्रकारामुळे शहरातील सोसायट्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधोरेखित झाला असून बोगस एजन्सींचे पितळदेखील उघड झाले आहे.
तळोजा वसाहतीत एका इमारतीत एसी दुरुस्त करण्यासाठी आलेल्या १९ वर्षीय व्यक्तीने इमारतीच्या पार्किंग परिसरात खेळत असलेल्या पाच वर्षीय मुलीला इमारतीच्या लिफ्टमध्ये बलात्कार केल्याचा प्रकार घडला होता. हा प्रकार वेळीच उघडकीस आल्याने आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते; तर काही महिन्यांपूर्वी तळोजा वसाहतीत एका सोसायटीच्या सुरक्षा रक्षकानेच चोरीसाठी मदत केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. विशेष म्हणजे या सुरक्षा रक्षकांच्या होणाऱ्या नेमणुकीची पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची पडताळणी होत नसल्याने या एजन्सींवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
----------------------
सुरक्षा रक्षकांसाठीचे निकष ः
पोलिस पडताळणी, आधारकार्ड, पॅनकार्ड, फोटो.
लिहिता-वाचता येणे आवश्यक.
सुरक्षा रक्षकांना गणवेश अनिवार्य.
पॅनकार्ड, आधारकार्ड बंधनकारक.
---------------------------------------
पोलिस आयुक्तांच्या सूचनांकडे दुर्लक्ष
- नवी मुंबई परिसरात घडणारे विविध गुन्हे तसेच चोरी, घरफोडी व इतर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाने काही महिन्यांपूर्वी ‘माझी सोसायटी, माझी सुरक्षा’ हा उपक्रम हाती घेतला होता. या वेळी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी सोसायटीचे आणि घर मालक पत्ता, संपर्क क्रमांक तसेच भाडेकरू ठेवल्यास त्याचे नाव, पत्ता, पोलिस ठाण्यात पडताळणी यांची परिपूर्ण माहिती देण्याचे आवाहन केले होते.
- सोसायटीच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या एजन्सीचे नाव, परवाना क्रमांक आणि ज्या सुरक्षा रक्षकाची नेमणूक केली आहे, त्यांची नावे राज्य आणि परराज्यांतील पत्ता आणि संपर्क क्रमांकासह स्थानिक पोलिस ठाण्यात कळवण्याचे आव्हान केले होते.
------------------------
तळोजा पोलिस हद्दीत गस्तीचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी सोसायटीचे सुरक्षा रक्षक जागृत असावेत, याविषयी मार्गदर्शन करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच स्वतः रहिवाशांच्या बैठका घेऊन जनजागृती केली जात आहे.
- जितेंद्र सोनवणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तळोजा