
म्युनिसिपल मजदूर संघाचा रौप्य महोत्सव
मुंबादेवी, ता. २२ (बातमीदार) ः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले अध्यक्ष असलेल्या म्युनिसिपल मजदूर संघाचा रौप्यमहोत्सव ३ जानेवारीला मुंबई मराठी पत्रकार संघात साजरा करण्यात येणार आहे. ही माहिती सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी दिली. या वेळी त्यांच्यासोबत दिलीप थोरवडे, संजय कापसे, श्रावण मोरे, वसंत जाधव, एसपी जाधव आणि आत्माराम कांबळे उपस्थित होते. या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले भूषवणार आहेत. माजी मंत्री अविनाश महातेकर, गौतम सोनावणे, सिद्धार्थ कासारे, बाळासाहेब गरुड, विवेक पवार, सुनील मोरे, सुनील जांगळे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. स्मरणिका प्रकाशन, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान, कोरोना योद्ध्यांचा सन्मान या वेळी करण्यात येणार आहे.