प्रेमपुरी बाल संस्कार केंद्रातर्फे मेगा बाल महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेमपुरी बाल संस्कार केंद्रातर्फे मेगा बाल महोत्सव
प्रेमपुरी बाल संस्कार केंद्रातर्फे मेगा बाल महोत्सव

प्रेमपुरी बाल संस्कार केंद्रातर्फे मेगा बाल महोत्सव

sakal_logo
By

घाटकोपर, ता. २२ (बातमीदार) ः प्रेमपुरी बाल संस्कार केंद्र, स्वामी प्रेमपुरी आश्रम ट्रस्ट यांच्‍यातर्फे मेगा बाल महोत्सव आयोजित केला जात आहे. या महोत्‍सवादरम्‍यान आंतरशालेय स्पर्धेसाठी पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. हा कार्यक्रम २० ते २२ जानेवारीदरम्यान प्रेमपुरी अध्यात्म भवन येथे होणार आहे. अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी असल्‍याची माहिती स्वामी प्रेमपुरी आश्रम ट्रस्ट बाल संस्कार केंद्राच्या विश्वस्त दीना मेहता यांनी दिली. या महोत्‍सवात होणारे कार्यक्रम हे गट स्पर्धा, तसेच वैयक्तिक कलागुणांना वाव देण्यासाठी आहेत. यामध्ये नृत्य, नाटक, गायन, हस्तकला, चित्रकला, मेहंदी, फुलांची मांडणी, गीता जप, निबंध लेखन इत्यादी स्पर्धांचा समावेश आहे.