पुनर्विकासाच्‍या मुद्यावर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था संघर्ष समितीचा मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुनर्विकासाच्‍या मुद्यावर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था संघर्ष समितीचा मोर्चा
पुनर्विकासाच्‍या मुद्यावर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था संघर्ष समितीचा मोर्चा

पुनर्विकासाच्‍या मुद्यावर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था संघर्ष समितीचा मोर्चा

sakal_logo
By

चेंबूर, ता. २२ (बातमीदार) ः मागासवर्गीय गृहनिर्माण सोसायट्यांच्‍या पुनर्विकासाकरिता सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, या मागणीसाठी मागासवर्गीय गृहनिर्माण संस्था संघर्ष समितीच्या वतीने चेंबूर येथील समाज कल्याण विभागावर मोर्चा काढण्यात आला होता.
विक्रोळी कन्नमवारनगर म्हाडा वसाहतीतील इमारती ४५ वर्षांपूर्वी सर्वसामान्य मागासवर्गीय लोकांकरिता देण्यात आल्या होत्या. मागासवर्गीय सदस्यांनी गृहनिर्माण सोसायटी स्थापन करून या इमारती खरेदी केल्‍या. त्याकरिता महाराष्ट्र होम हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनकडून कर्ज घेतले होते. या कर्ज प्रक्रियेत समाज कल्याण खाते जामीन म्हणून राहिले होते. या सभाससदांना समाज कल्याण खात्याच्या वतीने सभासदांना सबसिडी देण्यात आली होती. काही वर्षांनंतर त्‍याचे कल्याण विभागाच्या आदेशानुसार ‘मागासवर्गीय गृहनिर्माण योजना’ असे नामांतर करण्यात आले होते. या मागासवर्गीय घरधारकांनी कर्जाची परतफेड केल्याने बहुसंख्य इमारतीचे हस्तांतर करण्यात आले. या जीर्ण झालेल्या धोकादायक गृहनिर्माण सोसायटीचा पुनर्विकास करण्याची आवश्यकता होती; मात्र त्‍याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. सध्‍या सर्वत्र पुनर्विकास होत असताना सामाजिक न्याय खात्यानेही यांचे पुनर्विकास करण्याचे योजले आहे. मात्र त्‍यासाठी अनेक अटी व शर्ती ठेवल्‍या आहेत. त्‍यामुळे अडथळे निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर इतर गृहनिर्माण योजनेतील सर्व संस्था आणि सभासदांना म्हाडा, शासन, प्रशासन, घर खरेदी–विक्री अटीशर्तीमधून मुक्त करते तसेच मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थांना सकारात्मक भूमिका घेऊन निर्बंधातून मुक्त करावे, या मागणीसाठी संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.