व्यावसायिकावर चौघांकडून हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यावसायिकावर चौघांकडून हल्ला
व्यावसायिकावर चौघांकडून हल्ला

व्यावसायिकावर चौघांकडून हल्ला

sakal_logo
By

अंधेरी, ता. २२ (बातमीदार) ः जोगेश्‍वरीतील एका बांधकाम साईटवर शाहिद सलीम कुरेशी या ३२ वर्षांच्या व्यावसायिकावर चार जणांच्या एका टोळीने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात शाहिद हे गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांच्यावर जोगेश्‍वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी आकीब, अरबाज, फिरोज आणि जब्बार या चौघांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे.
शाहिद हा जोगेश्‍वरीतील अक्सा मशिदीजवळील लोटस पार्क दोनमध्ये राहत असून त्याचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजता तो त्याच्या सहकाऱ्‍यासोबत जोगेश्‍वरीतील बेहरामबाग, कॉसमॉस टॉवरसमोरील त्याच्या बांधकाम साईटवर होता. यावेळी तिथे चार जण आले आणि त्यांनी दहशत निर्माण करून शाहिदसह त्यांच्या दोन सहकाऱ्‍यांवर हल्ला केला होता. घातक शस्त्राने केलेल्या हल्ल्यात शाहिद हा गंभीररीत्या जखमी झाला होता. हल्ल्यानंतर ते चौघेही तेथून पळून गेले होते. जखमी झालेल्या शाहिदला नंतर तिथे उपस्थित कर्मचाऱ्‍यांनी तातडीने ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हल्ल्याची माहिती मिळताच ओशिवरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या प्रकरणी शाहिदसह इतर कामगारांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीनंतर पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. पळून गेलेल्या चारही हल्लेखोरांचा आता पोलिस शोध घेत आहेत.