Mon, Feb 6, 2023

‘त्या’ आरोपींना फाशी द्या : ढोणे
‘त्या’ आरोपींना फाशी द्या : ढोणे
Published on : 22 December 2022, 10:00 am
विक्रमगड, ता. २२ (बातमीदार) : माहीम येथील अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जिजाऊ संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती संदेश ढोणे यांनी पोलिस अधीक्षक आणि तपास अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. या प्रकरणातील आरोपींना पालघर पोलिसांनी यशस्वीरित्या अटक केली असून पालघर पोलिसांची ही कारवाई कौतुकास्पद आहे, पण गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता सदरचा खटला न्यायालयात जलद गतीने चालवण्याची विनंती करून संबंधित सर्व आरोपींना फाशीची कठोर शिक्षा द्यावी, असे ढोणे यांनी या पत्रात म्हटले आहे.