तळोज्यातील प्रदूषणावर शिक्कामोर्तब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळोज्यातील प्रदूषणावर शिक्कामोर्तब
तळोज्यातील प्रदूषणावर शिक्कामोर्तब

तळोज्यातील प्रदूषणावर शिक्कामोर्तब

sakal_logo
By

खारघर, ता. २२ (बातमीदार) : तळोजा औद्योगिक वसाहतीतून उग्र वास येत असल्याच्या तक्रारी राज्याच्या लोक आयुक्तांकडे करण्यात आल्या आहेत. तसेच याप्रकरणी पनवेल तहसील कार्यालयाने एका पथकाचीदेखील स्थापना करण्यात आली होती. या पथकाने केलेल्या पाहणीत तळोजा वसाहतीतून उग्र वास येत असल्याचे मान्य केले असून तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे.
तळोजा औद्योगिक क्षेत्रात रात्री सोडण्यात येणाऱ्या केमिकलच्या उग्र वासामुळे तळोजा, खारघर, रोडपाली, कळंबोली आणि जवळपास असलेल्या गावांतील नागरिकांना त्रास होत आहे. याविरोधात आदर्श सामाजिक संस्थेचे राजीव सिन्हा आणि समीर पाटील यांनी राज्याचे लोकआयुक्त व्ही. एम. कानडे यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन २१ नोव्हेंबर ते १७ डिसेंबरदरम्यान तळोजा औद्योगिक वसाहतीतून होणाऱ्या प्रदूषणाची पाहणी करण्यात आली होती. त्यासंबंधीचा अहवाल पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे पाठवला असून याप्रकरणी आता ५ जानेवारीला सुनावणी होणार आहे.
--------------------------
तळोजा औद्योगिक वसाहतीतून बुधवार रात्री आठ ते दहाच्या सुमारास उग्र वास येत होता. याबाबत पनवेल प्रांत अधिकारी आणि नवी मुंबई येथील महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाचे अधिकारी डी. बी. पाटील यांना संदेश पाठवल्यानंतर तासाभराने येणारा वास बंद झाला.
- राजीव सिन्हा, सदस्य, आदर्श सामाजिक संस्था