बोगस आदिवसांनी हटवा ः निकोले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोगस आदिवसांनी हटवा ः  निकोले
बोगस आदिवसांनी हटवा ः निकोले

बोगस आदिवसांनी हटवा ः निकोले

sakal_logo
By

कासा, ता. २२ ( बातमीदार) ः राज्य सरकारने बोगस आदिवासींना अधिसंख्या पदांवर सरंक्षण देण्याचा घेतलेला निर्णय आदिवासींवर अन्याय करणारा आहे. ही पदे त्वरित रिक्त करून मूळ आदिवासींना त्या पदावर सामावून घेतले पाहिजे, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले यांनी केली. यासाठी त्यांनी हिवाळी अधिवेशनात विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.

या वेळी आमदार निकोले म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत की, ज्या बोगस आदिवासींनी नोकऱ्यांमध्ये जागा बळकावल्या आहेत, ही पदे त्वरित रिक्त करून जो मूळ आदिवासी आहे त्यांना या पदांवर सामावून घेतले पाहिजे; पण या सरकारने त्या निर्णयाचा अपमान केला असून बोगस आदिवासींना संरक्षण दिले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामीण भागात अनेक शिक्षित, उच्चशिक्षित तरुण नोकरीची वाट बघतोय. दिवसेंदिवस त्या तरुणांचे वय वाढत जात आहे. आज या तरुणांना कुठेतरी रोजंदारीवर काम करावे लागत आहे; तर याच तरुणांचे आई-वडील शेतात काम करून अर्धपोटी राहून आपल्या मुलांना शिक्षण देत आहेत; परंतु आज या सरकारच्या केवळ एका निर्णयामुळे त्यांची स्वप्ने अपूर्ण राहत आहेत. आम्ही सर्व आदिवासी आमदार एकत्र आलो आहोत. आम्ही या सरकारला इशारा देतो की त्वरित हा निर्णय मागे घेऊन बोगस आदिवासींची पदे रिक्त करावीत. जे खरे मूळ आदिवासी आहेत त्यांची नियुक्ती झाली पाहिजे, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा निकोले यांनी दिला. याप्रसंगी आमदार राजेश पाटील, सुनील भुसारा, दौलत दरोडा, हिरामण खोसकर, डॉ. किरण लहामटे, धर्मरावबाबा आत्राम, नितीन पवार, सहसराम कोरोटे आदी उपस्थित होते.