कल्याण डोंबिवलीतील पाणीपुरवठा मंगळवारी बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण डोंबिवलीतील पाणीपुरवठा मंगळवारी बंद
कल्याण डोंबिवलीतील पाणीपुरवठा मंगळवारी बंद

कल्याण डोंबिवलीतील पाणीपुरवठा मंगळवारी बंद

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २२ ः कल्याण-डोंबिवली शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी (ता. २७) बंद राहणार आहे. पालिकेच्या बारावे, मोहिली, नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्र व मोहिली उदंचन केंद्रातील विद्युत व यांत्रिकी उपकरणांची देखभाल व दुरुस्तीचे काम यादिवशी करण्यात येणार आहे. यामुळे बारावे, मोहिली, नेतीवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रातून होत असलेला पाणीपुरवठा मंगळवारी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत बंद राहणार आहे. यामुळे कल्याण पूर्व, पश्चिम, डोंबिवली पूर्व व पश्चिम या भागास होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.