सामुहिक बलात्कार प्रकरणात आणखी एक अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामुहिक बलात्कार प्रकरणात आणखी एक अटक
सामुहिक बलात्कार प्रकरणात आणखी एक अटक

सामुहिक बलात्कार प्रकरणात आणखी एक अटक

sakal_logo
By

पालघर, ता. २२ (बातमीदार)ः माहीममधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीला पालघर न्यायालयाने २८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

माहीममधील एका पंधरावर्षीय मुलीवर नऊ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना १८ डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी आठ जणांविरुद्ध सातपाटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आरोपींना फाशी द्यावी, अशी मागणी विविध स्तरांतून आली. त्यातच विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनीही आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी मागणी केली. या प्रकरणात आज नवव्या आरोपीला अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता त्यांना २८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.