
सोलापूर-अजमेर दरम्यान हिवाळी विशेष गाड्या
मुंबई, ता. २२ : नाताळनिमित्ताने रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सोलापूर-अजमेरदरम्यान साप्ताहिक हिवाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २९ डिसेंबर २०२२ ते २६ जानेवारी २०२३ या कालावधीत दर गुरुवारी ट्रेन क्र. ०९६२८ विशेष एक्स्प्रेस दुपारी १२.५० वाजता सोलापूर येथून सुटेल आणि अजमेर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५.०५ वाजता पोहोचेल. ट्रेन क्र. ०९६२७ विशेष एक्स्प्रेस २८ डिसेंबर २०२२ ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीत अजमेर येथून दर बुधवारी सकाळी ९ वाजता सुटेल आणि सोलापूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३० वाजता पोहोचेल. या दोन्ही एक्स्प्रेस कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा जंक्शन, रतलाम, नागदा जंक्शन, कोटा, सवाई माधोपूर जंक्शन आणि जयपूर जंक्शन थांबणार आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण विशेष शुल्कासह उद्यापासून (ता. २३) सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.