Sun, Jan 29, 2023

रानशेत वधना पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन
रानशेत वधना पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन
Published on : 22 December 2022, 2:05 am
कासा, ता. २२ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील रानशेत वधना ग्रुप ग्रामपंचायतीमधील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. या गावासाठी तीन वर्षांपूर्वी ही योजना मंजूर झाली होती; परंतु कोरोना प्रादुर्भावामुळे या योजनेच्या कामासाठी निधी उपलब्ध झाला नसल्याने काम रखडले होते, पण आता या योजनेला मंजुरी मिळाल्याने रानशेत वधनाच्या सरपंच ज्योती वरखंडा यांच्या हस्ते या योजनेच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या अमिता घोडा, रघुनाथ बोलाडा, अरुणा बोलाडा यांच्यासह सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.