आनंद परांजपेंविरोधात तक्रार दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आनंद परांजपेंविरोधात तक्रार दाखल
आनंद परांजपेंविरोधात तक्रार दाखल

आनंद परांजपेंविरोधात तक्रार दाखल

sakal_logo
By

डोंबिवली, ता. २२ ः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल समाजमाध्यमावर कथीतरीत्या मानहानीकारक शब्द उच्चारल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांच्याविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील यांनी ही तक्रार गुरुवारी (ता.२२) रात्री दाखल केली.

राष्ट्रवादीचे माजी खासदार व ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी त्यांच्या ट्विटरवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचा एक व्हिडियो पोस्ट केला होता. त्याचे शीर्षक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान करणारे असल्याचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने म्हटले आहे. मुख्यमंत्री पदाचा अपमान केल्याबद्दल आनंद परांजपे यांच्या विरोधात मानहानी व राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सहकार्यालय प्रमुख सागर बापट आणि कृष्णा पडीलकर यांनी केली. रामनगर पोलिस ठाण्यात कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, संतोष चव्हाण, सागर जेधे यांनी वरिष्ठांची भेट घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर मानपाडा पोलिस ठाण्यात कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील व कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांची भेट घेत परांजपे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असल्याची माहिती महेश पाटील यांनी दिली.