
हिरो ‘एक्सपल्स २००टी’ लाँच
मुंबई, ता. २३ : सुधारित टुरिंग क्षमता, उच्च दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञान आणि डिझाइनसह हिरो मोटोकॉर्पने ‘एक्सपल्स २००टी’ ही दुचाकी लाँच केली.
रि-ट्यून केलेले पॉवर-टॉर्क कर्व्ह आणि सुधारित ट्रान्समिशन रेशोमुळे ग्राहक प्रत्येक प्रवासाचा आनंद घेऊ शकतात, असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. या दुचाकीत इंटेलिजण्ट असिस्टन्स सिस्टम्ससोबत दर्जात्मक टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, एलसीडी इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी, गिअर इंडिकेटर, ट्रिप मीटर आणि सर्व्हिस रिमांइडर आदी फीचर्स दिले आहेत. एक्सपल्स २००टी ४ व्हीची एक्स शोरूम किंमत १,२५,७२६ इतकी ठेवण्यात आली आहे. एक्सपल्सने भारतातील दुचाकीस्वारांमध्ये लोकप्रियता मिळवली आहे. नवीन ‘एक्सपल्स २००टी ४ व्ही’देखील ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास हिरो मोटोकॉर्पचे अधिकारी रणजीवजीत सिंग यांनी व्यक्त केला.