ठाणे पोलिस दलात नव्या नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाणे पोलिस दलात नव्या नियुक्ती
ठाणे पोलिस दलात नव्या नियुक्ती

ठाणे पोलिस दलात नव्या नियुक्ती

sakal_logo
By

ठाणे, ता. २३ (वार्ताहर) ः ठाणे पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांची बदली करण्यात आली होती. या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे.

सहायक पोलिस आयुक्त उत्तम कोळेकर यांची आर्थिक गुन्हे शाखा येथे नियुक्ती करण्यात आली. अरुण क्षीरसागर यांची वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर आव्हाड यांची मुंबईत बदली झाली. त्यानंतर रिक्तपदी वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून कन्हैयालाल थोरात यांची नियुक्ती करण्यात आली. अप्पासाहेब जानकर यांची वाहतूक शाखा कोनगाव, अंकुश म्हस्के यांची पोलिस निरीक्षक म्हणून विशेष शाखेत, सुनील पुंगळे यांची नियंत्रण कक्ष, तर मालमत्ता कक्ष गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक आनंद रावराणे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नियंत्रण कक्षात दत्ता गवाळे यांची; तर उल्हासनगर गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून राजेंद्र अहिरे यांची नियुक्ती, चितळसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून गिरीश गोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.