जोशी बेडेकर महाविद्यालयात नवरंगाचे रंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जोशी बेडेकर महाविद्यालयात नवरंगाचे रंग
जोशी बेडेकर महाविद्यालयात नवरंगाचे रंग

जोशी बेडेकर महाविद्यालयात नवरंगाचे रंग

sakal_logo
By

ठाणे, ता. २३ (बातमीदार) ः विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर कला, वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालयातील ‘नवरंग’ महोत्सवाची आज (ता. २४) सांगता होणार आहे. आज शेवटच्या दिवशी फोटोग्राफी व शॉर्ट फिल्म मेकिंग स्पर्धा होणार आहे. २० डिसेंबर रोजी या महोत्सवाला सुरुवात झाली होती.

नवरंग महोत्सवाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य घडवायचे असेल, तर त्यांच्या कलागुणांना नवरंगसारख्या फेस्टिवलमधून वाव द्यावा, असे आवाहन केले. या वेळी नवरंगप्रमुख प्रा. योगेश प्रसादे उपस्थित होते. तसेच सर्व प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी खादी डे, ब्लॅक अँड रेड डे, ग्रुप अलाईक डे, साडी अँड टाय डे, पारंपरिक डे असे विविध रंगीबेरंगी ‘डे’ज साजरे केले. संपूर्ण महाविद्यालयात गायन, वक्तृत्व, बातमीवाचन, काव्यलेखन, सेल्फ टॉक, ट्रेड माईन घेण्यात आल्या. प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये प्रा. रूपेश महाडिक विजेते ठरले.