नाताळनिमित्त मुंबई-पणजी शिवशाही बस सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाताळनिमित्त मुंबई-पणजी शिवशाही बस सुरू
नाताळनिमित्त मुंबई-पणजी शिवशाही बस सुरू

नाताळनिमित्त मुंबई-पणजी शिवशाही बस सुरू

sakal_logo
By

मुंबई, ता. २३ : नाताळनिमित्त सुटीला गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या मुंबई विभागामार्फत मुंबई सेंट्रल ते पणजी शिवशाही बससेवा सुरू केली आहे. ही बस दररोज संध्याकाळी ४:३० वाजता मुंबई सेंट्रल येथून निघून पनवेल, महाड, चिपळूण, कणकवली, सावंतवाडीमार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता पणजी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात पणजीहून संध्याकाळी ४:३० वाजता निघून त्याच मार्गाने मुंबई सेंट्रल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता पोहोचेल. या बसचे मुंबई ते पणजी तिकीट १,२४५ रुपये असून ही बससेवा १ जानेवारी २०२३ पर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळातर्फे सांगण्यात आले आहे.