बँकेत भरण्यासाठी दिलेले पैसे घेऊन पोबारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बँकेत भरण्यासाठी दिलेले पैसे घेऊन पोबारा
बँकेत भरण्यासाठी दिलेले पैसे घेऊन पोबारा

बँकेत भरण्यासाठी दिलेले पैसे घेऊन पोबारा

sakal_logo
By

ठाणे, ता. २३ (वार्ताहर) ः बँकेत भरणा करण्यासाठी दिलेले पैसे घेऊन कर्मचाऱ्याने पोबारा केल्याची घटना नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. संध्या कंटेनर्स मुव्हर्स या ट्रान्स्पोर्ट कंपनीतील कर्मचारी गौरव उपाध्याय याला बँकेत भरणा करण्यासाठी १२ लाख ८९ हजार ३५० रुपये एवढी रक्कम दिली होती. ही रक्कम बँकेत न भरता ती घेऊन त्याने पळ काढला.

संध्या कंटेनर्स मुव्हर्स या ट्रान्स्पोर्ट कंपनीत काम करणारा कामगार गौरव उपाध्याय याला शेषमणी शोभनाथ मिश्रा (वय ६५)यांनी खात्यावर भरण्यासाठी १२ लाख ८९ हजार ३५० रुपयांची रक्कम दिली. सदरची रक्कम बँकेत न भरता आरोपी उपाध्याय यांनी स्वतःकडे ठेवून तिचा अपहार केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मिश्रा यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात अपहार केल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपस नौपाडा पोलिस करीत आहेत.