वसईमध्ये कॅरनिवलची धूम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईमध्ये कॅरनिवलची धूम
वसईमध्ये कॅरनिवलची धूम

वसईमध्ये कॅरनिवलची धूम

sakal_logo
By

विरार, ता. २३ (बातमीदार) ः वसईच्या माणिकपूर येथे आज (ता. २३) संध्याकाळी कार्न्हिव्हलकॅरनिवलची धूम पाहायला मिळाली. यात उंट, घोडे, रथ यांची मिरवणूक निघाली. त्याबरोबर कोरोना काळात सेवा देणाऱ्या सफाई कामगार, डॉक्टर, पोलिस यांना सलामी देण्यात आली. या कॅरनीवलची सुरुवात माजी उपमहापौर प्रकाश रोड्रिंक्स यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

माणिकपूर येथील रसिक रंजन नाट्य मंडळातर्फे ख्रिसमस कॅरनिवलचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्वधर्मीय एक आहोत, असा संदेश देण्यात आला. त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळात नागरिकांची सेवा करणारे डॉक्टर, सफाई कर्मचारी आणि पोलिस यांची वेशभूषा केलेल्या मुलांना घोड्यावर बसवण्यात आले होते. ट्रॅफिकचे रूळ पाळा, सफाईवर लक्ष द्या, कोरोनामध्ये डॉक्टरांनी केलेल्या कमला सलाम असे संदेश देण्यात आले, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष विल्यम मिस्किटा व ॲलन डिमेलो यांनी दिली.