अंमली पदार्थ बाळगणारा अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंमली पदार्थ बाळगणारा अटकेत
अंमली पदार्थ बाळगणारा अटकेत

अंमली पदार्थ बाळगणारा अटकेत

sakal_logo
By

ठाणे, ता. २३ (वार्ताहर) ः ठाण्याच्या विवियाना मॉलसमोरील सर्व्हिस रोड, चिरागनगर, ठाणे पश्चिम येथे मेथाक्वालोन या अमली पदार्थासह एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याविरोधात वर्तकनगर पोलिस ठाण्यात अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रकांत कुमार नन्नहक महातो (वय२६) असे या आरोपीचे नाव आहे.

आरोपीची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे २२ ग्रॅम मेथाक्वालोन नावाचा अमली पदार्थ आढळला. त्याची किंमत १ लाख ११ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्याच्या विरोधात वर्तकनगर पोलिस ठाण्यात बेकायदा अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक गिरीश बने करीत आहेत.