दहिवलीपाडा शाळेत गणितोत्सवाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहिवलीपाडा शाळेत गणितोत्सवाचे आयोजन
दहिवलीपाडा शाळेत गणितोत्सवाचे आयोजन

दहिवलीपाडा शाळेत गणितोत्सवाचे आयोजन

sakal_logo
By

किन्हवली, ता. २४ (बातमीदार) : दहिवली पाडा जिल्हा परिषद शाळेत प्रसिद्ध गणित‍ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिनानिमित्त गणितोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम मंडलिक यांनी गणित‍ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्‌घाटन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना शिक्षक दत्तात्रय पाटील यांनी गणित विषयाचे महत्त्‍व व विद्यार्थ्यांनी गणित विषयात आवड निर्माण करावी, असे सांगितले. याप्रसंगी ‘परिसरातील गणित’ या संकल्पनेवर आधारित गणित जत्रेचेही आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी परिसरातील वस्तूंपासून तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन या वेळी मांडण्‍यात आले. पाने, फुले, दगड यांच्या सहाय्याने विविध संकल्पना समजावून सांगण्यात आल्या. किराणा दुकान, भाजीपाला दुकान इत्यादी स्टॉल मांडल्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव घेतला. बेरिज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, गणितीय सापशिडी, संख्याज्ञान, मापन इत्यादी संकल्पनेवर आधारित साहित्य मांडल्यामुळे विद्यार्थ्यांना गणित समजणे सोपे झाले. शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहून या गणितोत्सवात सहभाग घेतला.