शिक्षकांच्या पगारासाठी ४४ कोटी द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांच्या पगारासाठी ४४ कोटी द्या
शिक्षकांच्या पगारासाठी ४४ कोटी द्या

शिक्षकांच्या पगारासाठी ४४ कोटी द्या

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : ठाणे व पालघर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतरांच्या डिसेंबर महिन्याच्या वेतनासाठी निधी कमी पडत आहे. यासाठी शासनाने ४४ कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करावा, अशी मागणी भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे. याबाबत अनिल बोरनारे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त तसेच शिक्षण संचालकांना निवेदन देऊन ही मागणी केली आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यात अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच सैनिकी विद्यालयाचे जवळपास ११ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या वेतनापोटी दरमहा ८० कोटी रुपयांचा निधी खर्च केला जातो. वेतन व भविष्यनिर्वाह निधी पथक कार्यालयाकडे मात्र पुरेसा निधी नसल्याने डिसेंबर महिन्याचे पगार कसे होतील, या चिंतेत शिक्षक आहे. त्यातच शालार्थ प्रणाली बंद असल्याने वेतन बिले मंजूर करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे शालार्थ प्रणाली तातडीने दुरुस्ती करावी व डिसेंबर महिन्याच्या वेतनासाठी तातडीने ४४ कोटी रुपये मंजूर करून जानेवारी ते मार्चपर्यंतचा निधीही उपलब्ध करून देण्याची मागणी भारतीय जनता पक्ष शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी शासनाकडे केली आहे.