Sat, Feb 4, 2023

सवादे गावात पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन
सवादे गावात पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन
Published on : 24 December 2022, 11:41 am
विक्रमगड, ता. २४ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील मौजे हातणे /देहर्जे व सवादे गावात जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संदीप पावडे यांचा हस्ते जलजीवन मिशनअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या वेळी पंचायत समिती विक्रमगडचे उपसभापती विनोद भोईर, देहर्जे व हातणे ग्रामपंचायत सरपंच, सवादे ग्रामपंचायत सरपंच संजय वैजल, पाणीपुरवठा उपअभियंता सुरेश पवार, शाखा अभियंता यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.