Wed, Feb 1, 2023

‘आपली माती...’ संघटनेची आज जाहीर सभा
‘आपली माती...’ संघटनेची आज जाहीर सभा
Published on : 24 December 2022, 11:48 am
घाटकोपर, ता. २४ (बातमीदार) ः तालुका पातळीवरील समस्यांविरोधात आवाज उठवत प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणून ‘आपली माती, आपली माणस’ संघटनेने रायगड जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, कल्याण, वसईत आपली मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शहरी भागात राहणाऱ्या युवकांना सोबत घेऊन समस्यांविरोधात आवाज उचलण्यासाठी कामगार नेते राज पार्टे यांनी ही संघटना स्थापन करून काही महिने झाले असून या संघटनेची पहिली जाहीर सभा घाटकोपरमध्ये येत्या रविवारी (ता. २५) दुपारी ३ वाजता नीलकमल येथील हॉलमध्ये कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडणार आहे. या सभेला रायगड जिल्ह्यासह मुंबई, ठाणे, कल्याण, वसईतून कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, असे संघटनेचे सचिव प्रवीण पार्टे यांनी सांगितले.