वर्तक महाविद्यालयाचा स्नेहसंमेलनाचा सोहळा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्तक महाविद्यालयाचा स्नेहसंमेलनाचा सोहळा उत्साहात
वर्तक महाविद्यालयाचा स्नेहसंमेलनाचा सोहळा उत्साहात

वर्तक महाविद्यालयाचा स्नेहसंमेलनाचा सोहळा उत्साहात

sakal_logo
By

विरार, ता. २४ (बातमीदार) : वसई येथील अण्णासाहेब वर्तक कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा पार पडला. या वेळी भरतनाट्यम् या शास्त्रीय नृत्यप्रकारासह लावणी, लेझीम, कोळी, गरबा, भांगडा अशा लोकनृत्यांनी आणि फिल्मी, हिप-हॉप, फ्युजन, रिमिक्स अशा पौर्वात्य आणि पाश्चिमात्य परंपरांमधील अनेक वैविध्यपूर्ण नृत्यशैलींनी हा सोहळा सजला होता. चित्रपटगीते तसेच विविध वेषभूषा आणि विद्यार्थ्यांचे वाद्यवृंद, ध्वनी-प्रकाश, रंगीबेरंगी पारंपरिक आणि आधुनिक वेशभूषा, फॅशन शो, एकात्मतेचा आणि सेवेचा संदेश देणारी सांगीतिका अशा अनेक गोष्टींनी या वार्षिकोत्सवात वैविध्यपूर्ण रंग भरले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांच्या हस्ते आणि उपप्राचार्या डॉ. जानकी सावगाव व डॉ. अनिलकुमार शेळके यांच्या उपस्थितीत या वार्षिकोत्सवाचे उद्‌घाटन करण्यात आले. उपप्राचार्य प्रा. स्वाती जोशी, पर्यवेक्षक प्रा. आत्माराम गोडबोले आणि सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. मनीषा गावड यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रा. हेमंत डोंगरे आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.