सहयोग संस्थेतर्फे सर्वधर्म स्नेहमिलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहयोग संस्थेतर्फे सर्वधर्म स्नेहमिलन
सहयोग संस्थेतर्फे सर्वधर्म स्नेहमिलन

सहयोग संस्थेतर्फे सर्वधर्म स्नेहमिलन

sakal_logo
By

वसई, ता. २४ (बातमीदार) : नाताळनिमित्त सहयोग संस्थेतर्फे भुईगाव डोंगरी येथील सहयोग सेंटरमध्ये गुरुवारी (ता. २९) संध्याकाळी चार ते सहा या वेळेत सर्व धर्म स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी खासदार राजेंद्र गावित, प्राचार्य डॉक्टर सोमनाथ विभुते, भंते नागसेन, हुजेफा पूनावाला, दत्तात्रय देशमुख, ख्रिस्तोफर रॉड्रिग्ज, स्वामी मुसाफिरानंद, शेख मैनुद्दीन, फादर जो अल्मेडा आदी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फादर मायकल डिसोजा असणार आहेत. या वेळी फादर मायकल डिसोजा यांच्या ‘स्मरणगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे; तर नाताळनिमित्त होणाऱ्या नाताळ गीत संध्या कार्यक्रमात गायक ब्लेस डिमेलो, नील परेरा, सुधीर शिंगाडे, दत्तात्रय वर्तक, सुमेधा शिंगाडे सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, अशी माहिती संयोजक मनोज आचार्य यांनी दिली.