चॉकलेट्सला मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चॉकलेट्सला मागणी
चॉकलेट्सला मागणी

चॉकलेट्सला मागणी

sakal_logo
By

चॉकलेटला पसंती

वैभवी शिंदे, नेरूळ
नाताळ म्हटला की केक, कुकीज, चॉकलेट, भेटवस्‍तूंची चलती. चॉकलेट हा प्रत्‍येकाच्या आवडीचा विषय. लग्न समारंभ, बर्थडे, सण-उत्‍सव असो चॉकलेटचा समावेश भेटवस्‍तूंपासून मिठाई, मोदक, स्‍विट डीश म्‍हणून आवर्जून केला जातो. नाताळनिमित्त येणारा सांताही बच्चे कंपनीना भेटवस्‍तूबरोबरच चॉकलेट भेट देतो.
‘कुछ मीठा हो जाये'' असे म्हणत कोणतेही चांगले काम सुरू करण्याआधी तोंड गोड करण्याची पद्धत आहे. गोड खाण्यासाठी, एखाद्यावरचे प्रेम व्यक्‍त करण्यासाठी, चूक झाल्‍यास माफी मागण्यासाठी इतकेच नव्हे तर अनेकदा झोप उडवण्यासाठी अथवा मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठीही चॉकलेटचा आधार घेतला जातो.
नाताळनिमित्त मॉल्स आणि शॉपमध्ये विविध फ्लेवर्सचे आणि आकाराचे आणि आकर्षक पॅकिंगमध्ये चॉकलेट आंबा, अननस, चिकू, सुकामेवा, हनी चॉकलेट, मिल्क चॉकलेट, चटपटी इमली आदी चवीसह उपलब्ध आहेत. मोठमोठी कार्यालये, कारखान्यांमधून बल्क स्वरूपात चॉकलेट गिफ्टची मागणी नोंदवली जाते. त्यामुळे एकाचवेळी मोठी उलाढाल होते.

चॉकलेट खाण्याचे फायदे
- तणाव दूर करण्यासाठी
- उच्च रक्तदाबाच्या त्रास कमी करण्यासाठी
- मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी
- वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी चॉकलेट फायदेशीर
- कॉलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.

.................

सिक्रेट सांता
कोमल गायकर, घणसोली
यंदा सर्वत्र ख्रिसमस आनंदात आणि उत्‍साहात साजरा होत आहे. चर्च, मॉल, शोरूम्‍स, ठिकठिकाणी सजावटी, जल्लोष आनंदाला सुरवात झाली आहे. सध्या ख्रिसमसनिमित्त महाविद्यालये, ऑफिस, कॉर्पोरेट क्षेत्रात सिक्रेट सांताचा ट्रेण्ड पाहायला मिळतो. ज्यात कलर थीम, ड्रेस कोड, सांता गिफ्ट्स, सांस्‍कृतिक मनोरंजनात्‍मक कार्यक्रम होतात.
सिक्रेट सांता म्‍हणजे एखाद्याच्या नकळत भेटवस्‍तू देणे, मग तो मित्र असो, घरातील सदस्‍य अथवा कार्यालयीन सहकारी. त्‍यानिमित्त आजूबाजूचे वातावरण आनंदी-खेळीमेळीचे होते. गेल्‍या दोन-चार वर्षांत सिक्रेट सांताचा फॅड आपल्‍याकडे वाढले आहे. त्‍यानिमित्त एकत्रित भेटीगाठी, खेळ, नाच, गाणी, खाद्याची मेजवानीचे नियोजन केले जाते. तर काही कार्यालयांत थीम ठरवून त्‍याप्रमाणे वेशभूषा केली जाते. यात सर्वच जण आनंदाने सहभागी होतात.

कसा साजरा करावा
एक ग्रुप किंवा ऑफिसमधील टीमने त्यांचे नाव कागदाच्या तुकड्यावर लिहून ते नाव टोपी, बॉक्स किंवा इतर कंटेनरमध्ये टाकायचे असते. ही टोपी वेशभूषा केलेला संता अथवा कोणाच्याही मार्फत थोडी हलविली जाते. त्‍यानंतर प्रत्येक सहभागी व्यक्‍तीचे नाव निवडायचे असते. गिफ्ट्सवर किती खर्च करावा याचेही बजेट ठरवले जाते. प्रत्येक सहभागीला त्यांच्या सिक्रेट सांताला भेटवस्तू देता येते. विशेष म्‍हणजे, आपल्याला दिलेली भेटवस्तू कोणी दिली, हे शेवटपर्यंत कळत नाही.


भेटवस्तूमध्ये मुलांसाठी बेल्ट, गॉगल्स, घड्याळ, टी शर्ट, टोपी, रुमाल, व्हॉयलेट, टाय आदी पर्याय असतात तर मुलींसाठी मेकअपचे साहित्य, पर्स, बांगड्या, कानातले, नेकलेस, टॉप, टी शर्टचा पर्याय असतो. याशिवाय अत्तर, एरफोन्स, मोबाइल कव्हर्स, फ्रेम्स आदी भेटवस्‍तूही दिल्‍या जातात.

वर्षभर काम केल्‍यावर वर्षाअखेर थोडा होणार विरंगुळा म्‍हणून कार्यालयांत सिक्रेट सांताचे उत्‍साहात आयोजन केले जाते. आपल्याला काय गिफ्ट मिळेल, याची उत्‍सुकता सर्वांनाच असते. शिवाय थीमनुसार वेशभूषा करण्यात वेगळीच मजा असते.
- कृष्णा यादव, कॉर्पोरेट कर्मचारी