Mon, Jan 30, 2023

शहापुरात मोफत आरोग्य तपासणी शिबिर
शहापुरात मोफत आरोग्य तपासणी शिबिर
Published on : 24 December 2022, 11:59 am
खर्डी, ता. २४ (बातमीदार) : शहापूर येथील क्रिस्टल केअर हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच मूत्रपिंड, मूतखडा, प्रोस्टेट स्वादुपिंड अशा शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत मोफत करण्यात येणार आहे. या गोरगरीब रुग्णांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमोल गीते यांनी केले आहे. रक्तदाब, दमा, मधुमेह व स्त्री रोगतज्ज्ञ तपासणी,
सर्व मोफत होणार आहे. पित्ताशयाच्या खड्याची शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे फक्त वीस हजार रुपयांमध्ये औषधासहित करून मिळणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे अवाहन डॉ. अमोल गीते यांनी केले आहे.