कादोडी नाताळ अंकाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कादोडी नाताळ अंकाचे प्रकाशन
कादोडी नाताळ अंकाचे प्रकाशन

कादोडी नाताळ अंकाचे प्रकाशन

sakal_logo
By

विरार, ता. २४ (बातमीदार) : उत्तर वसईत सामवेदी कुपारी समाजाच्या बोलीभाषेत कादोडी या नावाने गेली १० वर्षे अंक प्रकाशित केला जात आहे. या अंकाचे प्रकाशन वंडा येथील ९८ वर्षीय अपलान गोन्साल्वीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते जॉन टी. परेरा उपस्थित होते. जॉन टी. परेरा यांनी, समाजातील काही तरुणांनी आपल्या बोलीभाषेत सुरू केलेल्या कादोडी अंकामुळे पुन्हा एकदा या समाजामध्ये आपल्या संस्कृती आणि बोलीभाषेच्या संवर्धनासाठी प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे, असे सांगत या अंकाचे कौतुक केले. यावेळी अंकाचे कार्यकारी संपादक एडवर्ड डिसोजा, प्रमुख संपादक ख्रिस्तोफर रिबेलो आदी उपस्थित होते.