गणितीय रांगोळ्या, रेखाचित्रांतून रामानुजन यांचा गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणितीय रांगोळ्या, रेखाचित्रांतून रामानुजन यांचा गौरव
गणितीय रांगोळ्या, रेखाचित्रांतून रामानुजन यांचा गौरव

गणितीय रांगोळ्या, रेखाचित्रांतून रामानुजन यांचा गौरव

sakal_logo
By

कासा, ता. २४ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भराड शाळेत राष्ट्रीय गणित दिवस थोर गणितज्ञ श्रीनिवासन रामानुजन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून गणितोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी गणितीय रांगोळ्या, भौमितिक आकार, आकृतिबंध, गणितज्ञांची रेखाचित्र रेखाटण्यात आली होती.

उजळणी वाचन, संख्यांचे वाचन, नाणी व नोटा, संख्यांची स्थानिक किमत, वेगळे चित्रओळख, संख्यांचा लहान-मोठेपणा, भौमितिक आकार, दशमान परिमाने, सरळव्याज सूत्रे, घातांक सूत्रे, विस्तार सूत्रे, बैजिक राशी सूत्रे, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार पाटी शैक्षणिक साहित्याची मांडणी केली होती. मुख्याध्यापक सीताराम भोये यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक, अध्यापनातील गणित विषयाचे महत्त्व, थोर गणितज्ञ श्रीनिवासन रामानुजन यांची माहिती, गणिती कोडी, बौद्धिक कोडी, गणिती पेटीतील साहित्याचा उपयोग इत्यादी मुद्द्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
गणितोत्सव मेळाव्याला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुदाम माळी, उपाध्यक्षा निर्मला पारधी, सदस्या यमुना पारधी, ग्रुप ग्रामपंचायत कासाचे सदस्य अविनाश वरठा, ग्रामस्थ राजेश माळी, सूरज वावरे, विनायक बरड, संजय काटकर, दर्शना वायेडा, सपना डवला तसेच महिलावर्ग, युवक-युवती, विद्यार्थी, शिक्षक सुनील कोरडे, लक्ष्मण वाख उपस्थित होते.