Mon, Jan 30, 2023

ठाण्यातील बंद घरात चोरट्यांची हातसफाई
ठाण्यातील बंद घरात चोरट्यांची हातसफाई
Published on : 24 December 2022, 12:21 pm
ठाणे (वार्ताहर) : धर्मवीर नगर परिसरातील बंद घराचे कडीकोयंडा उचकटून चोरट्याने घरात प्रवेश करीत सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा अडीच लाखांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. २२ डिसेंबर रोजी दुपारी फिर्यादी ३६ वर्षीय महिला घर बंद करून बाहेर गेली होती. चोरट्याने घराचे कुलूप उचकटून घरातील दोन लाख ५२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. याप्रकरणी महिलेने चितळसर पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली.