Tue, Jan 31, 2023

गोडावूनमधून ५२ लाखांच्या साहित्याचा अपहार
गोडावूनमधून ५२ लाखांच्या साहित्याचा अपहार
Published on : 24 December 2022, 1:00 am
ठाणे, ता. २४ (वार्ताहर) : कंपनीतील कर्मचाऱ्याने ५२.५६ लाखांचा माल गोडावूनमधून काढत त्याची विक्री केल्याचा गुन्हा कापूरबावडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. लोढा ग्रुप ऑफ कंपनीच्या माजिवडा येथील गोडावूनमधून स्टोअर कीपर असलेले कर्मचारी यशवंत विठ्ठल पाटील (रा. बदलापूर) यांनी खोट्या नोंदीच्या कागदपत्राने कंपनीतील ५२ लाख ५६ हजार रुपयांच्या विविध साहित्याचा अपहार करून परस्पर विक्री करण्यात आली. याप्रकरणी मंदार संदीप मिरजकर (वय २९) यांनी कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.