Sun, Feb 5, 2023

निचोळे येथे नळपाणी योजनेचे भूमिपूजन
निचोळे येथे नळपाणी योजनेचे भूमिपूजन
Published on : 24 December 2022, 12:36 pm
वाडा, ता. २४ (बातमीदार) : तालुक्यातील निचोळे येथे जलजीवन मिशनअंतर्गत नळपाणी योजनेचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्या मिताली बागुल यांच्या हस्ते करण्यात आले. या भूमिपूजन कार्यक्रमास सरपंच सुचिता पष्टे, सदस्य भाई पष्टे, रूपेश पष्टे, चंद्रकांत पष्टे, किरण पष्टे, जगन पष्टे, कैलास पष्टे, योगेश पवार, समीर पष्टे, रोहिदास पष्टे, सचिन पष्टे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. ही योजना लवकरात लवकर पूर्ण करून ग्रामस्थांना शक्य तेवढ्या लवकर पाणी उपलब्ध करून द्यावे, असे आदेश ठेकेदार यांना मिताली बागुल यांनी दिले.