कालनिर्णयच्या विविध भाषेतील आवृत्या प्रसिद्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कालनिर्णयच्या विविध भाषेतील आवृत्या प्रसिद्ध
कालनिर्णयच्या विविध भाषेतील आवृत्या प्रसिद्ध

कालनिर्णयच्या विविध भाषेतील आवृत्या प्रसिद्ध

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ : कालनिर्णय या प्रसिद्ध दिनदर्शिकेने ५१व्या वर्षात पदार्पण केले आहे. एक कोटीहून अधिक खप असलेले कालनिर्णय हे मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी, कन्नडा, तमिळ आणि तेलुगू या सात भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. पंचांग, भविष्य, सणवार, तिथी-नक्षत्रे, शास्त्रार्थ ही कालनिर्णयची प्रमुख अंगे असून सर्वसामान्यांना सुलभ आणि सोप्या भाषेत सांस्कृतिक रिफॅार्म करण्याचा प्रयत्न असल्याचे कालनिर्णयने एका प्रसिद्धी पत्रकात सांगितले आहे. वाचकांच्या सोयीनुसार व वेगवेगळ्या धाटणीचा ग्राहकवर्ग लक्षात ठेवून कालनिर्णयने आकर्षक आणि विविध प्रकारच्या आवृत्त्या प्रसिद्ध केल्या आहेत. विविध उपक्रमाद्वारे कालनिर्णयने गेली ५० वर्षे भारतीयांच्या मनावर ठसा उमटवला आहे, यांचीच नोंद घेत, ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशने जगातील सर्वाधिक खप असण्याचा बहुमान कालनिर्णयला दिला आहे. कालनिर्णयने लोकांच्या गरजा लक्षात घेऊन उपयुक्त प्रकाशने वेळोवेळी उपलब्ध करून दिली आहेत व भविष्यातही असाच प्रयत्न असल्याचे कालनिर्णयने सांगितले आहे.