राजाभाऊ म्हात्रे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजाभाऊ म्हात्रे यांचे निधन
राजाभाऊ म्हात्रे यांचे निधन

राजाभाऊ म्हात्रे यांचे निधन

sakal_logo
By

सरळगाव, ता. २४ (बातमीदार) : सामाजिक कार्यकर्ते व आशीर्वाद मेडीकलचे मालक राजाभाऊ म्हात्रे (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी (ता. २४) कल्याण येथील रहात्या घरी निधन झाले. मुरबाड तालुक्यात राजाभाऊ म्हणून ते परिचित होते. महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री शांताराम घोलप यांचे ते निकटवर्तीय होते. त्यांना राजकारणापेक्षा सामाजिक कार्यात गोडी होती. राजाभाऊ हे ठाणे-पालघर जिल्हा महाराष्ट्रीय वैश्य समाजाचे माजी विश्वस्त होते. स्नेहल म्हात्रे यांचे ते वडील होते.