विद्यार्थ्यांसाठी आकाशगंगा अवतरणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांसाठी आकाशगंगा अवतरणार
विद्यार्थ्यांसाठी आकाशगंगा अवतरणार

विद्यार्थ्यांसाठी आकाशगंगा अवतरणार

sakal_logo
By

वाशी, ता. २८ (बातमीदार) : खासगी शाळेलाही लाजवेल, अशा पद्धतीने माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज विद्यालय साकारले आहे. या विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या माध्यमातून आकाशगंगा न दाखवता प्रात्याक्षिकमध्ये दाखवण्यात येणार आहे.
पालिकेच्या वतीने सध्या आकाशगंगा या उद्यानाचे काम सुरू असून नूतन वर्षात हे काम सुरू होणार आहे. आकाशगंगा उद्यानाच्या बाजूला असणाऱ्या भिंतीवरही विद्यार्थ्यांसाठी आवश्यक गणित, भूगोल, विज्ञान या विषयाचे चित्र साकारण्यात येत आहे. त्यामुळे हे उद्यान आकर्षित असे वाटत आहे. रबाळेमध्ये साकारण्यात येणाऱ्या आकाशगंगा उद्यानामध्ये नऊ ग्रह; सूर्य साकारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बुद्धिबळ, सापशिडीचा पट असणार आहे. जपिंग वॉलही बांधण्यात येणार आहे. उद्यानामध्ये आकाशगंगेची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या माध्यमातून प्रात्यक्षिकरित्या आकाशगंगा दिसणार आहे. त्यातून शिक्षणही मिळणार आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात प्रथमच आकाशगंगेच्या माध्यमातून उद्यान साकारण्यात येणार आहे.

छत्रपती शाहू महाराज विद्यालयात आकाशगंगाच्या माध्यमातून उद्यान साकारण्यात येणार आहे. त्यांचा विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक माध्यमातून शिकता येणार आहे. त्याचप्रमाणे या उद्यानात बुद्धिबळ व सापशिडीचा पटही साकारण्यात येणार आहे.
- सुधाकर सोनवणे, माजी महापौर, नवी मुंबई पालिका