Fri, Feb 3, 2023

कर्जत स्थानकात मंगळवारी ब्लॉक
कर्जत स्थानकात मंगळवारी ब्लॉक
Published on : 24 December 2022, 1:07 am
मुंबई, ता. २४ : मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकात पोर्टल उभारण्यासाठी मध्य रेल्वेने मंगळवारी (ता. २७) विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे काही उपनगरीय लोकल सेवा रद्द असणार आहेत. मंगळवारी सकाळी १०.४५ ते दुपारी १२ पर्यंत घाट विभागात आणि कर्जतपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत ट्रेन क्र. २२७३१ हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस आणि ट्रेन क्र. ११०१४ कोईम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आपल्या गंतव्य स्थानकात २० ते ६५ मिनिटे उशिराने पोहोचणार आहेत. तसेच कर्जतहून सकाळी १०.४० वाजता सुटणारी खोपोली लोकल आणि ११.२० वाजता खोपोली येथून सुटणारी कर्जत लोकल रद्द राहणार आहे.