‘ॲप बेस्ड’ टॅक्सींवर कारवाई करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ॲप बेस्ड’ टॅक्सींवर कारवाई करा
‘ॲप बेस्ड’ टॅक्सींवर कारवाई करा

‘ॲप बेस्ड’ टॅक्सींवर कारवाई करा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २४ : परराज्यांतील नागरिक मुंबईसह परिसरात बनावट कागदपत्रांच्या आधारे ॲप बेस्ड टॅक्सीचे परवाने मिळवत आहेत. ओला, उबर आणि रॅपीडो कंपन्यांकडून अशा चालकांचे पोलिस व्हेरिफिकेशन न करताच त्यांना बुकिंग दिले जाते. परिणामी महिलांचे विनयभंग, बलात्काराच्या घटना घडत असून अशा वाहनांवर कारवाईची मागणी मनसेने केली आहे. ओला, उबर आणि रॅपिडो या तिन्ही कंपन्यांकडून ‘अॅग्रिगेटर गाईडलाईन २०२०’ नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचा आरोप मनसे वाहतूक सेनेने केला आहे.

‘अॅग्रिगेटर गाईडलाईन २०२०’ नियमांचे उल्लंघन होत असल्याबद्दल १० मे २०२२ रोजी तत्कालीन परिवहन आयुक्तांना मनसेने पत्र दिले होते. आयुक्तांनी बैठकीमध्ये लवकरच अशा वाहनांवर कारवाईचे आश्वासन दिले होते; मात्र अद्याप कारवाई होत नसल्याने मनसे वाहतूक सेनेने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. ओला, उबर आणि अन्य अॅप बेस कंपन्यांकडून महाराष्ट्रात टप्पा वाहतूक होत असल्याने स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारावर गदा आली आहे. त्यासोबतच या वाहनांच्या बहुतेक चालकांचा परवाना परराज्यांतील असून त्यांचे वास्तव्य वाहनात असते. त्यामुळे अशा चालकांकडून गैरकृत्य होण्याची शक्यता असल्याने परिवहन विभागाने अशा वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे संजय नाईक यांनी केली आहे.