पश्चिम रेल्वेच्या डुंगरी बिलिमोरा स्थानकात ब्लॉक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम रेल्वेच्या डुंगरी बिलिमोरा स्थानकात ब्लॉक!
पश्चिम रेल्वेच्या डुंगरी बिलिमोरा स्थानकात ब्लॉक!

पश्चिम रेल्वेच्या डुंगरी बिलिमोरा स्थानकात ब्लॉक!

sakal_logo
By

मुंबई, ता. २४ : पश्चिम रेल्वेच्या गुजरातमधील डुंगरी बिलिमोरा स्थानकात पुलाच्या कामासाठी अप आणि डाऊन मार्गावर उद्या (ता. २५) सकाळी ९.३५ ते दुपारी २.३५ या वेळेत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या ५ एक्स्प्रेस उशिराने धावणार असून, त्यामध्ये मुंबईतील चार गाड्यांचा समावेश आहे. या ब्लॉकमुळे दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्स्प्रेसला एक तास २० मिनिटे उशीर होणार आहे. वांद्रे टर्मिनस-श्री माता वैष्णो देवी कटडा स्वराज एक्स्प्रेसला एक तास १५ मिनिटे, वांद्रे टर्मिनस-अमृतसर पश्चिम एक्स्प्रेसला ३० मिनिटे, वांद्रे टर्मिनस-दिल्ली सराय रोहिल्ला गरीब रथ एक्स्प्रेसला २५ मिनिटे उशीर होणार असल्याची माहिती रेल्वेतर्फे देण्यात आली.