Wed, Feb 8, 2023

अवध, सिटी एक्स्प्रेसला अतिरिक्त थांबा
अवध, सिटी एक्स्प्रेसला अतिरिक्त थांबा
Published on : 24 December 2022, 3:10 am
मुंबई, ता. २४ : पश्चिम रेल्वेने ‘अवध’ एक्स्प्रेस आणि ‘सिटी’ एक्स्प्रेसला शामगढ येथे अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेतला आहेत. ट्रेन क्र. १९०३७/१९०३८ वांद्रे टर्मिनस-बरौनी अवध एक्स्प्रेसला शामगढ स्थानकावर थांबा देण्यात येणार आहे. याशिवाय अवध एक्स्प्रेसची मुदत २३ जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ट्रेन क्र. २०९४१/२०९४२ वांद्रे टर्मिनस-गाजीपूर सिटी एक्स्प्रेसला शामगढ स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात आलेला आहे. तसेच या एक्स्प्रेसची मुदतही २७ जून २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे. या दोन्ही एक्स्प्रेसचे थांबे, रचना आणि वेळेची संपूर्ण माहिती रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.