तलवारीने हल्ला करणारे अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तलवारीने हल्ला करणारे अटकेत
तलवारीने हल्ला करणारे अटकेत

तलवारीने हल्ला करणारे अटकेत

sakal_logo
By

अंधेरी, ता. २४ (प्रतिनिधी) ः किरकोळ वादातून धारदार शस्त्राने हल्ला करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. सुरेश अरुण भिमाले, उज्ज्वल रामकुमार शर्मा ऊर्फ भडका आणि राजेश एडवीन मुथ्यू ऊर्फ कालिया अशी आरोपीची नावे आहेत. तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. १८ डिसेंबर रोजी गोरेगाव येथील आरे कॉलनी, खडकपाडा येथे हा प्रकार घडला होता.

खडकपाडा येथे अजय नावाचा तरुण त्याच्या मित्रासोबत कॅरम खेळत होता. तेव्हा आरोपींनी तिथे येऊन त्याला सिगारटे मागितली. ती देण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १८ डिसेंबर रोजी सर्व आरोपींनी भांडण उकरून काढले. अजयला कोयता, तलवार यांनी मारहाण केली. यात अजय गंभीररीत्या जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.