टेम्पोसह रकम घेऊन नोकराचे पलायन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेम्पोसह रकम घेऊन नोकराचे पलायन
टेम्पोसह रकम घेऊन नोकराचे पलायन

टेम्पोसह रकम घेऊन नोकराचे पलायन

sakal_logo
By

अंधेरी, ता. २५ (बातमीदार) ः खाद्यतेलाची डिलीव्हरी करून येताना टेम्पोसह रकम घेऊन मदतनीस म्हणून काम करणाऱ्या नोकराने पलायन केल्याची घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी जुनेद ऊर्फ जावेद अली या नोकराविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अपहारासह चोरीचा गुन्हा नोंदवला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
महेश दामा हे मालाड येथे राहत असून त्यांचा खाद्यतेल विक्रीचा व्यवसाय आहे. या कामासाठी त्यांनी एक मिनी टेम्पो घेतला होता. त्यांच्याकडे संतोष निवले हा चालक; तर जुनेद हा मदतनीस म्हणून कामाला आहेत. याच टेम्पोतून ते ग्राहकांना वसई, विरार, मालाड, नालासोपारा येथे खाद्यतेल पाठवताना त्यांना मालाचे इन्व्हॉईस बिल बनवून देत होते. २२ डिसेंबरला एका ग्राहकाने तेलाचे २० हजार २७५ रुपयांचे पेमेंट केले होते. मागाठाणे येथे आल्यानंतर संतोष हा काही कामानिमित्त टेम्पोतून उतरला होता. काम संपल्यानंतर तो घटनास्थळी आला असता त्याला जुनैद दिसला नाही. तिथे टेम्पो आणि टेम्पोमध्ये ठेवलेली कॅशही नव्हती. बराच वेळ वाट पाहून जुनैद आला नाही. तो टेम्पो आणि कॅश घेऊन पळून गेल्याची खात्री होताच त्याने ही माहिती महेश दामा यांना दिली. त्यांनी जुनैदला फोन केला; मात्र त्याचा मोबाईल बंद होता. या घटनेनंतर त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांत जुनैदविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी जुनैदविरुद्ध टेम्पोचा अपहार करून पैशांची चोरी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. पळून गेलेल्या जुनैदचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.