अभिनेत्री तुनीषा शर्माची प्रेमसबंधातून आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनेत्री तुनीषा शर्माची प्रेमसबंधातून आत्महत्या
अभिनेत्री तुनीषा शर्माची प्रेमसबंधातून आत्महत्या

अभिनेत्री तुनीषा शर्माची प्रेमसबंधातून आत्महत्या

sakal_logo
By

नालासोपारा, ता. २४ (बातमीदार) : अभिनेत्री तुनीषा शर्मा हिने चित्रीकरणाच्या सेटवरच प्रेमसंबंधांतून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज (ता. २४) घडली आहे. वसई तालुक्यातील कामण परिसरातील भाजनलाल स्टुडिओमध्ये चित्रीकरण सुरू असताना सहअभिनेता सैजान खान याच्या रूममध्ये तिने आत्महत्या केली.
तुनीषाची आई वनिता शर्मा हिने याच मालिकेतील अभिनेता सैजान खान यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्याला वालीव पोलिसांनी ताब्यात घेतले असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वालीव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक पोलिस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली. दोघांचे प्रेमसंबंध होते आणि याच प्रेमसंबंधांतून ही आत्महत्या केली असल्याची तक्रार तुनीषा शर्मा हिच्या आईने पोलिसांना दिली. आज दुपारी सैजान खान आणि तुनीषा या दोघांनी एकत्र त्याच्या रूममध्ये जेवण केले. त्यानंतर सैजान सेटवर शूटिंगसाठी गेला आणि त्याच्या रूममध्ये तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.