
पनवेल महापालिकेची शून्य कचरा मोहीम
नवीन पनवेल, ता.२५ (वार्ताहर)ः पनवेल महापालिका स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवत आहे. याच अनुषंगाने खारघर विभागातील विद्यार्थ्यांना ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत निर्मितीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
पनवेल महापालिकेच्यावतीने शून्य कचरा मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमाद्वारे उपस्थित विद्यार्थ्यांना, नागरिकांना कचरा वर्गीकरणाबाबत महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी, पिल्लई कॉलेजचे प्राध्यापक रिझवी, एनएसएसचे विद्यार्थी, स्वच्छता निरीक्षक पराग, संदीप भोईर, अतुल मोहकर, पेणधर विभागामधील सर्व सुपरवायझर तसेच स्वच्छता दूत उपस्थित होते. यावेळी प्रभाग ७ रोडपाली विभागामध्ये सेक्टर १२ मध्ये म्हसोबा तलाव येथे पालापाचोळा व नागरिकांनी टाकलेल्या कचऱ्यातून खतनिर्मिती करण्यात आली.
------------------------------
कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती
पनवेल बस स्थानक, रेल्वे स्टेशन, आरटीओ कळंबोली, वडाळा लेक येथे पनवेल महापालिकेमार्फत स्वच्छ भारत आणि सिटीझन पर्सेप्शन सर्व्हे अंतर्गत नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाबाबत पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. यावेळी विभागातील प्रभाग अधिकारी तसेच स्वच्छता निरीक्षकांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.