शिवळे महाविद्यालयात आर्थिक साक्षरता विषयावर कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवळे महाविद्यालयात आर्थिक साक्षरता विषयावर कार्यशाळा
शिवळे महाविद्यालयात आर्थिक साक्षरता विषयावर कार्यशाळा

शिवळे महाविद्यालयात आर्थिक साक्षरता विषयावर कार्यशाळा

sakal_logo
By

मुरबाड, ता. २५ (बातमीदार) : महिला बचत गटाच्या महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे म्हणून रिझर्व बँकेच्या वित्तीय समावेश व विकास विभागाच्या वतीने महिलांसाठी आर्थिक साक्षरता या विषयावर शीवळे महाविद्यालयात शिबिर आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनसेवा शिक्षण मंडळाचे चिटणीस पांडुरंग कोर; तर प्रमुख पाहुणे म्हणून मंडळाचे सहचिटणीस भास्कर हरड, शिवळे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. गीता विशे, संचालक मुरलीधर दळवी उपस्थित होते. या शिबिरास प्रमुख वक्ते म्हणून रिझर्व बँकेचे व्यवस्थापक विश्वजित करंजकर, अग्रणी बँक जिल्हा व्यवस्थापक जे. एन. भारती, सहायक व्यवस्थापक राधादेवी तमंग, रोमानी रहांगडाले व सैता पावसकर उपस्थित होते. महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिलांसाठी या शिबिरात एटीएम कार्ड वापर, आर्थिक साक्षरता आदी विषयांवर माहिती देण्यात आली. प्रश्नमंजुषा या आर्थिक विषयाबाबत प्रश्न विचारून त्याचे बरोबर उत्तर देणाऱ्या पाच महिलांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गीता विशे यांनी, सूत्रसंचालन प्रा. प्रिया भगत यांनी; तर प्रा. हेमांगी राणे यांनी आभार मानले.