Tue, Feb 7, 2023

कल्याणमध्ये १३ जानेवारीपासून कोकण महोत्सव
कल्याणमध्ये १३ जानेवारीपासून कोकण महोत्सव
Published on : 25 December 2022, 12:10 pm
कल्याण, ता. २५ (बातमीदार) : कल्याण पूर्वमध्ये नवीन वर्षात कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान आयोजित कोकण महोत्सव १३ जानेवारी २०२३ रोजी सुरुवात होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन भाजप आमदार आणि स्वागताध्यक्ष गणपत गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. २२ जानेवारी २०२३ पर्यंत सुरू राहणाऱ्या या महोत्सवात राज्यातील सर्वपक्षीय नेते हजेरी लावणार आहेत. कल्याण पूर्वमधील पोटे मैदानामध्ये दररोज सायंकाळी ६ ते १० काळात कोकणातील आणि स्थानिक विविध प्रसिद्ध कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे. या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष आमदार गणपत गायकवाड असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय मोरे यांनी केले आहे.