सेवा संघाचा सामाजिक संस्थांचा पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवा संघाचा सामाजिक संस्थांचा पुरस्कार जाहीर
सेवा संघाचा सामाजिक संस्थांचा पुरस्कार जाहीर

सेवा संघाचा सामाजिक संस्थांचा पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

मुलुंड, ता. २५ (बातमीदार) ः महाराष्ट्र सेवा संघातर्फे सविता गद्रे यांच्या सौजन्याने दरवर्षी सामाजिक संस्था पुरस्कार उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थेला दिला जातो याच अनुषंगाने या वर्षीचा पुरस्कार जळगावच्या यजुवेंद्र महाजन यांच्या ‘दीपस्तंभ’ या संस्थेला जाहीर झाला आहे. ही संस्था दिव्यांग, दृष्टिहीन, अनाथ, आदिवासी आणि उपेक्षित वंचित समूहातील विद्यार्थ्यांना शिक्षित करून त्यांना नोकऱ्या मिळवून देत आहे. सामाजिक संस्था पुरस्कार सोहळा रविवारी (ता. १) संध्याकाळी सु. ल. गद्रे सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सारस्वत को-ऑप. बँकेचे अध्यक्ष गौतम एकनाथ ठाकूर यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ठाकूर यांची मुलाखत सुप्रसिद्ध कथा लघुकथा आणि स्तंभ लेखिका माधुरी मंगेश ताम्हणे घेणार असून सूत्रसंचालन सायना योगेश जोशी करणार आहेत. कार्यक्रमाला प्रवेश मोफत असून सर्व नागरिकांनी त्याला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.