Mon, Feb 6, 2023

चित्रकला स्पर्धेत रमले विद्यार्थी
चित्रकला स्पर्धेत रमले विद्यार्थी
Published on : 25 December 2022, 12:13 pm
भांडुप, ता. २५ (बातमीदार) ः खासदार मनोज कोटक यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (ता. २४) सह्याद्री विद्यामंदिर आणि पराग विद्यालय भांडुप पश्चिम येथे माजी नगरसेविका साक्षी दळवी यांनी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सह्याद्री विद्यमंदिर आणि पराग विद्यालय मधील सहाशे विद्यार्थी सहभागी झाले होते. कोरोना रोखण्यासाठीच्या अनेक कल्पना या वेळी मुलांनी आपल्या चित्रातून मांडल्या. या वेळी मनोज कोटक यांनी मार्गदर्शन करीत मास्क घालण्याचे आवाहनही केले. कार्यक्रमात माजी नगरसेविका साक्षी दळवी, माजी आमदार श्याम सावंत, विधानसभा अध्यक्ष प्रवीण दहितुले, नगरसेवक भालचंद्र शिरसाट आदी मान्यवर हजर होते.