विश्रामपूर शाळेत चित्रकला स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विश्रामपूर शाळेत चित्रकला स्पर्धा
विश्रामपूर शाळेत चित्रकला स्पर्धा

विश्रामपूर शाळेत चित्रकला स्पर्धा

sakal_logo
By

बोईसर, ता. २५ (बातमीदार) : स्व. कपिल चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चित्रकला व भेटवस्तू दान समारंभ जिल्हा परिषद शाळा विश्रामपूर येथे आयोजित करण्यात आला होता. या वेळी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. ही चित्रकला स्पर्धा दोन गटांमध्ये घेण्यात आली. प्रथम व द्वितीय पारितोषिक मिळालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले; तर उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना पुस्तकवाटप करण्यात आले. कपिल पाटील यांच्या स्मरणार्थ विश्रामपूर शाळेला पुस्तकांसाठी कपाट भेट देण्यात आले. या वेळी तुषार ठाकरे यांनी प्रास्ताविकात कपिल पाटील चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. या ट्रस्टचे अध्यक्ष तथा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षक वैभव पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कपिल पाटील यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच चित्रकला स्पर्धा आणि पुस्तकवाटप करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. या वेळी कपिल पाटील यांचे आई-वडील, चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य मेघा पाटील, छाया पाटील, परेश पाटील, तन्वी ठाकरे, वसरे- विश्रामपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रुती कडू, उपसरपंच भूपेंद्र नाईक, शालेय समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते हरेश्वर पाटील, उमेश पाटील, रणजीत पाटील, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद सोगले यांनी केले; तर सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पाटील यांनी आभार मानले.